मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय पक्षांनी आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा आराखडा उघड केला. विधानसभा निवडणुकीत युतीच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले की,तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. ते म्हणाले की, कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरू आहे.
तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत बसून जागावाटपाची प्रक्रिया अंतिम करत असल्याचे शरद पवार म्हणाले. येत्या 10 दिवसांत जागावाटपाचा करार होईल, “यानंतर महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आपापले उमेदवार ठरवतील. जागा वाटप आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते जनतेसमोर जाऊन आपली मते मांडतील.” असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.