जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी ४ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यक्रमांनंतर सायंकाळी ५.५५ वाजता जळगाव- खेडी येथे वारकरी भवन उद्घाटन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ना. अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्याचे सोमवार ४ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय • हेलिपॅड, वाशिमकडे प्रयाण. दुपारी ३.५५ वा. वाशिम येथून हेलिकॉप्टरने मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, . मुक्ताईनगर येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री पोहचणार आहेत.
सायंकाळी ४ वा. मौजे मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन होणार आहे. मुंढोळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) सायं. ४.४५ वा. आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री सदिच्छा भेट देणार आहेत. सायं. ५.०० मौजे कोथळी ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे श्री. संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन, सायं. ५.१० वा. मोटारीने मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर प्रयाण, सायं. ५.१५ वा. मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगावकडे त्यांचे प्रस्थान होणार आहे. सायं. ५.४० वा. जळगाव विम नितळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण व सायं. ५.५५ वा. खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचा भूमिपुजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.