तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि १२ सप्टेंबर २०२३ ला जळगाव ला येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव चा दौरा काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. १२ सप्टेंबर २०२३ ला दुपारी १२ वाजता वाजता शासकिय विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि.जळगावकडे येतील. यानंतर दुपारी 12.15 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन होईल नंतर तिथून ते मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे जातील.
यानंतर दुपारी 12.30 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती देतील (स्थळ – एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा) या कार्यक्रमानंतर दुपारी 2.30 वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे निघतील. यानंतर दुपारी 2.50 वा. नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव.
जळगाव व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि.जळगाव), दुपारी 3.30 वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.