जळगाव : शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून ३२ लाखांचा ऐवज लुटला नेल्याची घटना दोन दिवसापूर्वी पहाटे घडली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच पोलिसांनी एका दरोडेखोराला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यासोबत आणखी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, दरोडा टाकणारे गुन्हेगार दृष्टिक्षेपात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोमवारी पहाटे साडेतीन ते सव्वाचार वाजेदरम्यान भवानी माता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स या सुवर्णपट्टीवर दरोडा पडला. या दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे सहा पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यातील एलसीबी व शनिपेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाला एका दरोडेखोराचे लोकेशन नगर महामार्गावरून पुण्याकडे जात असल्याचे सापडले, त्यावरून पोलिसांनी त्याचा माग घेत त्याला पुण्यात मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन दुपारी जळगावात आणले
यापुर्वी दोघांना केले होते हद्दपार !
यातील सागरसिंग जुन्नी आणि रणजितसिंग जुन्नी या दोघांवर चोरी, हाणामारी, धारदार शस्त्र वापरून दमदाटी करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीसात दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना डिसेंबर २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातून