जळगाव : काल सर्वलोक नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना. वर्ष्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी ३१ डिसेंबर २०२३ अर्थात थर्टीफस्टच्या दिवशी विविध ठिकाणी रस्ता अपघाताच्या घटनेत दहा जण जखमी झाले. रविवारी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भरधाव वेग, ओव्हरटेक, कट या कारणांमुळे अपघाताला निमंत्रण मिळाले. शंकर सदाशिव निकुंभ (५०) डिमार्ट परिसर, पीतांबर संतोष भोई (१७) खंडेरावनगर,
किशोर रतन कुमावत (४२) नेरी ता. जामनेर, उमेश राजू धनगर (२८) नशिराबाद, सोमनाथ माधव वाघ (२५) पिंप्राळा हुडको, अण्णा शंकर बाविस्कर (४३) देवपिंप्री, दिनेश भिकन जावरे (२५) तुकारामवाडी, राजेंद्र एम पाटील (५७) हिवरखेडा, भास्कर धनगर (५५) नेरी, ता. जामनेर तसेच उमेश राठोड (२४) भोरखेडा, ता. मुक्ताईनगर यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमीवर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.