जळगाव : शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात चोरी करून फरार झालेल्या तीन संशयित आरोपींना जिल्हापेठ पोलीसांनी पिंप्राळा परिसरातून बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. याबाबत माहिती अशी कि,भाऊसाहेब राऊत विद्यालयातील मुख्याध्यापक लक्ष्मण तायडे हे, १९ जानेवारी रोजी सायंकाळी तायडे शाळेच्या सर्व रुमांना कुलूप लावून घरी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांचे सहकारी शाळेत आले. शाळेतील शिक्षक सागर हीवराळे हे वर्ग उघडत असतांना त्यांना क्रिडा साहित्य ठेवलेल्या रुमध्ये चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी याठिकाणाहून २ हजार ५०० रुपयांचे पाच पंखे आणि ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस नाईक जुबेर तडवी व पोकॉ अमित मराठे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल उर्फ ऑस्टिन युवराज सोनवणे (रा. पॉवर हाऊस, जळगाव) आणि आकाश उर्फ चिरक्या जगताप (रा. पिंप्राळा) हे दोघे चोरटे कैद झाले होते. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. साहित्य शेख जुबेर शेख मोहम्मद यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना देखील अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.