जळगाव: यापुढे मी निवडणूक लढणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा आमदार एकनाथ खडसे त्यांनी केली. ही राजकीय निवृत्ती नसल्याचेही स्पष्ट केले. खडसे म्हणाले, मी अजूनही पाच वर्षे विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील, तर मला त्याच्याशी देणेघेणे नाही.
मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते. मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही भूमिकेतून आहे. मी फक्त असे खडसे भाजपाच्या गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या. रावेरची झाल्यापासून निवडणूक जाहीर मी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे भाजपाचा प्रचार करावा लागेल.
रक्षा खडसे माझ्या सून आहेत. या दोन्ही मी भाजपाचा प्रचार करीत निवडणूक भाजपा लढवत आहे, जोडीला मदत करीत आहे, यांनी स्पष्ट केले. घरवापसीबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजपा प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबत निश्चिंत आहे. मी भाजपात येणार, या मुद्यावर काही लोकांची नाराजी होतीच. इतकी वर्षे सोबत काम केले होते म्हणून सर्व गुणगान करतील, असे होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करीत आहे, असे खडसे यांनी सांगितले.