महाराष्ट्र: काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने शुक्रवारी सकाळी त्याची अधिकृत घोषणा केली. तर काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, अमेठीतून निवडणूक न लढवण्याबाबत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेनेचे (यूबीटी) प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी घाबरत नाहीत. रायबरेली ही गांधी घराण्याची जागा आहे. “ते वायनाडमधून निवडणूक लढवतात आणि जिंकतात, पण गांधी घराण्यातील कोणीतरी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवावी, अशी आम्हा सर्वांची इच्छा होती, मग ते अमेठी असो किंवा रायबरेली. सोनिया गांधींनी राहुल गांधींना रायबरेलीतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे.