जळगाव : पेपर देण्यासाठी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात आलेली तरुणी बेपत्ता झाली. तरुणीला कुणी तरी पळवून नेले किंवा तिचे अपहरण केले, अशा आशयाची तक्रार तरुणीच्या वडिलांनी पोलिसात दिल्याने याप्रकरणी मिसिंग दाखल झाली. ही तरुणी तिचे लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी सोमवार, १ रोजी शहरातील एका महाविद्यालयात आली. त्याची खबर पोलिसाना लागताच तिला ताब्यात घेत रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणले. फूस लावून तरुणीला पळवून नेल्याच्या या प्रकरणाला लव्ह जिहादची किनार असल्याचा संशय नातेवाईकांसह हिंदुनिष्ठ संघटना, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात व्यक्त केला.
तरुणीस मुस्लीम तरूणाने पळवून नेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. त्यामुळे या घटनेकडे लव्ह जिहाद म्हणून पाहिले जात आहे. हिंदुत्ववादी संघटना या घटनेने आक्रमक झाल्या असून पोलिसांनी या घटनेची लव्ह जिहादच्या संशयाने तपास करण्याची मागणी केली आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार २६ मार्च रोजी ही तरुणी बेपत्ता झाली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही.
तरुणीच्या कुटुंबियांनी शहरातील महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधत तरुणी बेपत्ता असून तिचे लिव्हींग सर्टिफिकेट कोणालाही देवू नये, अशी विनंती केली होती. दरम्यान सोमवारी ही तरुणी महाविद्यालयात आली. तिने महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्याची मागणी केली. प्रशासनाने तत्काळ माहिती पोलिसांना दिली. महाविद्यालयात पोलिसांनी धाव घेत तरुणीला पोलीस ठाण्यात आणले.
महाविद्यालयात शिक्षण सुरु असताना अचानक लिव्हींग सर्टिफिकेटची आवश्यकता कशासाठी? तरुणीला कोणी जबरीने पळवून नेले काय? या अनुषंगाने तपासाला गती दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. माहिती कळताच तरुणीच्या आई वडिलांसह नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले. हा प्रकार कळाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्तेही धावून आले