जळगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदान मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक लोकसभेच्या ६ विधानसभा क्षेत्रनिहाय १४ टेबल लावण्यात येणार असून जळगाव शहरासाठी २५ तर ग्रामीणसाठी १८ फेऱ्यांव्दारे मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान मतमोजणीसाठी सहा विधानसभा क्षेत्रानुसार प्रत्येकी १४ टेबल लावण्यात आले आहेत. त्यात तीन अधिकारी व मोजणी सहायक असे १६८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जळगाव लोकसभेसाठी १४ उमेदवारांचे प्रत्येकी टेबलवर एक असे १४ तर रावेर लोकसभेसाठी २४ उमेदवारांचे २४ असे पतिनिधी उपस्थित राहू शकतील.
तीन प्रकारे होणार मतमोजणी लोकसभा मतदानाची तीन टप्प्यात मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पोस्टल मतदान यात गृह मतदान (ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींचे होम वोटींग), निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान तर सैन्यदलातील सर्विस वोटर यात सर्वात जास्त मतदान पाचोरा तालुक्यात असून त्यांचे इटीपीबीएस याचे जळगावसाठी ६ तर रावेर ४ टेबलवर प्रथम स्कॅनिंग केले जाईल. पोस्टल मतदानात जळगावसाठी १२ तर रावेरसाठी १० अशी विभागणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.करण्यात आली आहे.
मतमोजणी ठिकाणी ३ निवडणूक निरीक्षक
लोकसभा निवडणूक ते मतदान प्रकियेदरम्यान ३ निवडणूक निरीक्षक अधिकारी होते. त्याचप्रमाणे मतमोजणीसाठीदेखील प्रत्येक ३ विधानसभा क्षेत्रासाठी एक असे ३ निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. यात डॉ. राहुल गुप्ता आणि अरूणकुमार झा यांच्यासह मुक्ताईनगर, जामनेरसाठी महेंद्र पाल, अमळनेर, चोपडा, रावेरसाठी अशोककुमार यांची तर असून म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे नियंत्रण अधिकारी काम पहाणार आहेत.