वसुलीसोबत सेवासुविधांचाही वेग वाढवावा, आमदार सुरेश भोळे यांच्या मनपा प्रशासनाला कानपिचक्या

विविध करांची चांगल्याप्रकारे वसुली केली. त्याबाबत प्रशासन व अधिकायांचे अभिनंदन. ज्या प्रकारे प्रशासनाने घरोघरी जात वसुली केली त्याचप्रमाण महापालिका प्रशासनाने घरोघरी जात सेवासुविधा पुरवाव्यात. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका प्रशासनाला कानपिचक्या दिल्या आहेत. महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. विविध करांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी प्रशासक तथा आयुक्त व महसुल विभागाने चांगलीच कंबर कसली.

त्यातून ३१ मार्चपर्यंत २०४ कोटींपैकी ११० कोटींची वसुली केली आहे. या वसुलीबाबत प्रशासन स्वतःची पाठ थोपटून घेत असली तरी नागरीकांना मूलभूत नागरी सेवासुविधा देण्यात मात्र मागे पडली आहे. रस्ते, पथदिवे, गटारी, पाणी, खड्डे यासारख्या सुविधा देण्यासाठी महापालिकेत प्रशासकांना रोज प्रत्यक्ष भेटून नागरीक निवेदने देत आहेत. मात्र त्यांच्या निवेदनांना प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. सध्या लोकसभा निवडणूकांची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने आमदार, खासदार त्यात अडकले आहेत. पक्षाने त्यांच्यावर उमेदवारास निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांचे महापालिकेच्या आहे.

आमदार मनपा प्रशासनावर नाराज
शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनपाप्रशासनाने जशी घरोघरी जात करांची वसुली केली त्याच करांच्या वसुलीतून नागरीकांना सेवा व सुविधा द्याव्यात. कारण शहर विकासाची अनेक कामे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी शासनाकडून कोट्यावधींचा निधी मंजुर करून मनपास दिला आहे. मात्र कामे मुदतीत करून घेण्यात मनपा कमी पडत आहे.काय म्हणाले आमदार जे नागरीक त्रस्त झाले आहेत.

पिण्याचे पाणी, कुत्रांचा त्रास, रस्ते,
गटारी, पथदिवे, रस्त्यातील खड्डे किंवा मंजुर झालेल्या नविन रस्त्यांची कामे उशिराने होत असतील याबाबतही मनपाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. कारण जनतेचा रोष वाढत आहे. नुसती वसुली नव्हे तर सेवाही महत्त्वाची मनपा प्रशासनाने वसुली सोबतच सेवा देण्यावरही भर दिला पाहिजे. ते त्यांचे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्याची गरज आहे.
मनपा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष दरम्यान आमदार सुरेश भोळे भोळे यांनी मनपा प्रशासनाने जनतेला सेवासुविधा देण्यात दिरंगाई करू नये, रस्त्यांची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन केले आहे. त्यास मनपा प्रशासन कसे घेते हे लवकरच कळेल.