---Advertisement---

शरद पवार पुन्हा जळगाव जिल्ह्यात, करणार जोरदार शक्ती प्रदर्शन

by team
---Advertisement---

रावेर :  रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार, २१ एप्रिल रोजी जामनेर येथे येत आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. दरम्यान, शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याने रावेर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा व रावेर येथे सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी २० व रविवारी २१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत.

त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. त्यानुसार रावेर लोकसभा म तदारसंघात चोपडा व रावेर येथे शरद पवार सभा घेणार आहेत. जळगा जिल्ह्यातील रावेर लोकसभा म तदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी २० रोजी दिंडोरी जि. नाशिक येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत. त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील.रविवारी २१ रोजी ते सकाळी १० वाजता जामनेर येथे कार्यकर्ते मेळावा घेणार त्यानंतर रावेर येथे दुपारी १ वाजता सभा घेतील.

त्यानंतर दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.३ मे रोजी चोपडा येथे प्रचार सभा ११ वाजता व ३ वाजता भुसावळ येथे कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद सायंकाळी ६ वाजता, मुक्ताईनगर प्रचार सभा व ४ रोजी यावल येथे सकाळी ११ वाजता प्रचार सभा होणार आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य दिसत आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment