शाळा दुरूस्तीच्या अहवालाला ‘दिरंगाई’चे कोंदण लोकसभेच्या आचारसंहितेमुळे जूनचा ‘मुहूर्त

महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहराच्या विविध २३ शाळांपैकी केवळ पाच शाळांच्या दूरुस्तीबाबत शहर अभियंत्यांना चार महिन्यांपूर्वी कळविले होते. मात्र त्याबाबत बांधकाम विभागाने दिंरगाईचे धोरण अवलंबवित्यामुळे दुरूस्तीसाठी लोकसभेच्या मतमोजणीनंतरचा मुहूर्त काढला आहे. महापालिकेच्या मालकीच्या शहराच्या विविध भागात २३ शाळा आहेत. शाळांचा कारभार चालविण्यासाठी स्वतंत्र असे शिक्षण मंडळ आहे. शिक्षण मंडळावर प्रशासकीय अधिकारीही कार्यरत आहेत.ऑक्टोबरला केली पाहणीतत्कालीन आयुक्तांनी सहआयुक्तांना शाळांची तपासणी करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार शिक्षण मंडळासमवेत सहआयुक्तांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मनपा शाळा क्रमांक १२, मनपा शाळा क्रमांक १५, मनपा शाळा क्रमांक १७.लोकसभा निवडणूक मतमोजणीनंतरच दुरूस्ती

शाळा क्रमांक ५४ च्या स्लॅब टाकण्याबाबतची निविदा काढली आहे. मात्र लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे हे काम आता मतमोजणीनंतरच करण्यात येणार आहे. तसेच उर्वरीत शाळांची किरकोळ कामे आहेत तीही जूनमध्येच करण्यात येतील. – चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका जळगाव मनपा शाळा क्रमांक २४. मनपा शाळा क्रमांक ५४ यांची पाहणी केली. त्याचा अहवालही तत्कालीन आयुक्तांमार्फत शहर अभियंत्याकडे जमा केला आहे. या शाळांमध्ये छत खराब झालेले असून त्याचे पोपडे निघत आहेत. बाल्कनीही मोडकळीस आलेली असणे, फरशी निघणे, संरक्षक भिंत नसणे, विजेच्या वायरींग खराब असणे, शौचालये खराब असणे, शाळा परिसराची स्वच्छता नसणे. यासारख्या अनेक समस्या समितीच्या पाहणीत आढळून आल्या आहेत. दिरगाईचे धोरण नोव्हेंबर २०२३ मध्ये अहवाल मिळाल्यानंतर बांधकाम विभागाने याबाबत दिरंगाईचे धोरण अवलंबविले.

पाच शाळांपैकी शाळा क्रमांक ५४ च्याच दुरूस्तीची निविदा काढली आहे. यात शाळेचा जुना स्लॅब काढून तो नव्याने टाकण्यात येणार आहे.तत्कालीन आयुक्तांना स्वतःच्या दालनाच्या नूतनीकरणाची घाई तत्कालीन आयुक्त तथा प्रशासकांच्या कार्यकाळातच या शाळांची पाहणी करण्यात आली होती. त्यांना अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्या सहीने शाळा क्रमांक ५४ च्या दुरूस्तीची निविदा काढली होती. मात्र याचकाळात तत्कालीन आयुक्तांनी गरज नसताना त्यांचे तेराव्या मजल्यावरील दालनाचे तातडीने नूतनीकरण केले. त्यात त्यांच्या आवडीचे फर्निचर, खूर्चा व इतर साहित्य बसविले. हे काम तीन महिने चालले. याऐवजी या शाळांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला हवे होते असे मत काही पालकांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर व्यक्त केले. मतदान केंद्राच्या दूरूस्तीसाठी निघणार निविदा दरम्यान लोकसभा निवडणूकीसाठी महापालिकेच्या काही शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत.

त्यामुळे या शाळांमध्ये मतदारांना येण्यासाठीचा रस्ता, मतदान कक्षात लाईट, पंखे, शौचालयाची, पाण्याची सुविधा व या अनुषंगाने आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रापुरताच दुरूस्तीच्या निविदा काढणार आहे. त्या या शाळांचीही दुरूस्ती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.