शाळेत जाण्यास निघालेल्या बेपत्ता दोन मुली पोहोचल्या अमृतसरला, पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थिनी सुखरुप

जळगाव : घरुन शाळेत जाण्यास निघालेला अल्पवयीन मुलगा व मुलगी हे गुरुवार २८ रोजी बेपत्ता झाले. अन्य एका शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुली बुधवार २७ रोजी बेपत्ता झाल्या. या दोन्ही मुली रेल्वेने व्हाया भोपाळ अमृतसरला पोहोचल्या. शालेय ड्रेस दिसल्याने पोलिसांनी चौकशी केली, त्यानंतर या मुलींच्या पालकांशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती दिली. पालक मुलींना घेण्यासाठी शुक्रवारी अमृतसरला पोलिसांसोबत रवाना  झाले. या प्रकारामुळे पालकवर्गात खळबळ उडाली आहे.दोन चौदा वर्षीय अल्पवयीन मुली रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. बुधवार २७ रोजी त्या पालकांना सांगून शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. मात्र त्या शाळेत न जाता बेपत्ता झाल्या

शाळेत पोहोचल्याच नाहीत
शाळेचा ड्रेस घालून या दोन्ही अल्पवयीन मुली शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडत्या आणि त्या शाळेतून बेपत्ता झाल्या, अशी तक्रार पोलिसांकडे पालकांनी दिली. मात्र या दोन्ही मुली शाळेत पोहोचल्याच नाहीत. त्या जर गेटमधून शाळेत आल्या असत्या तर अनर्थ होण्याचा प्रश्नच नसता. असे प्रकार घडू नये, यासाठी पालकांनीही सजग असणे गरजेचे आहे. मुलगा व मुली यांच्या उपस्थिती व अभ्यासाबाबत शाळेत, क्लासमध्ये जावून पालकांनी माहिती घेतली पाहिजे, असे यावेळी मराठी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले.

रेल्वेत बसून पोहोचल्या भोपाळला या मुली शाळेत न जाता जळगाव
येथून रेल्वेत बसत्या. त्यानंतर त्या भोपाळ येथे उतरत्या. तेथून त्या दुसन्या गाडीने अमृतसरला स्टेशनवर उतरल्या. शाळेच्या ड्रेसमधील असलेल्या या दोन्ही मुलींची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता

त्या जळगावातील असल्याचा प्रकार उघडकीस आला, पोलिसांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पालक तसेच पोलीस दोघींना घेण्यासाठी अमृतसरकडे रवाना झाले, अशी माहिती वर्ग शिक्षक कोळी यांनी दिली.कुसुंबा – सिंधी कॉलनीतून बेपत्ता गुरुवार २८ रोजी सकाळी ११.३० वाजता कुसुबा येथुन अल्पवयीन मुलगा घरुन रिक्षात बसून इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जाण्यास निघाला. तसेच याच शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुलगी सिंधीकॉलनीतून घरुन पायी निघाली. मात्र हे दोघे विद्यार्थी शाळेत पोहोचले नाहीत.

शिक्षकांने संपर्क साधल्याने प्रकार उघड

एकाच वर्गातील हे दोघे शाळेत पोहोचले नसत्याचे लक्षात आल्याने शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या घरी तसेच अल्पवयीन मुलाच्या घरी संपर्क साधून शाळेत का? आले नाहीत, अशी विचारणा केली. परंतु दोघे शाळेत जाण्यासाठी घरून निघाले असल्याचे पालकांनी सांगितले. पालकांनी शाळेत धाव घेत चौकशी केली असता दोघे शाळेत पोहोचले नसल्याची खात्री झाली. दोघांच्या कुटुंबियांसह शिक्षकांनी या दोघा विद्यार्थ्यांचा तपास केला असता शोध लागला नाही.

पोलीस घेताहेत सीसीटीव्ही फुटेज
मुलगा तसेच मुलीला कोणीतरी पळवून नेले, अशी पालकांनी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शुक्रवार २९ रोजी इंग्लिश स्कूल परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या कामाला गती दिली. एका कॅमेरेचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. मात्र त्यात मुलगा किंवा मुलगी दिसून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अन्य सीसीटीव्ही फुटेजचा शोध सुरु केला. पोनि जयपाल हिरे तसेच पोउपनि दीपक जगदाळे यांनी या शाळेला भेट देत माहिती घेतली.