संपूर्ण देशात मान्सून झाला दाखल, राज्यात आज हवामान विभागाचा अंदाज काय आहे?

मुंबई : राज्याच्या काही भागात आज पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्राच चांगला पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट” देण्यात आला आहे.