---Advertisement---
जळगाव : हनुमंतखेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला.
हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिग ब्लॉक बसवून १०० टक्के पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा टांगा पलटी घोडे फरार कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंत खेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमि पूजन प्रसंगी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलभूत सुविधेअंतर्गत गावअंतर्गत काँक्रीटीकरण (१४ लाख) सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पथदिवे (७.५० लाख): या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर सुरू असलेल्या ८८ लाखाच्या पाणीपुरवठा हनुमंत खेडे धरणगांव यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील माजी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रेम राज पाटील, अनिल पाटील सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, सरपंच हुकुम पाटील, उपसरपंच विक्रम सोनवणे, शाखा प्रमुख सुनील पाटील, रतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, किशोर सोनवणे, दीपक पाटील, सरपंच गोरख पाटील, निशांत पाटील, बंटी पाटील, युवासेनेचे पवन पाटील, किरण पाटील, दिपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
योजनेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. येथील शाखा प्रमुख सुनील पाटील यांची मुलगी व नुकतीच पोलीस भरतीत मेरीटला आली. तिचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैया मराठे यांनी केले. आभार शाखा प्रमुख सुनील पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच सदस्य, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले.
---Advertisement---