जळगाव : नमस्कार, मी रिंकू राजगुरू जळगावमध्ये येतेय रविवार, ३ मार्च रोजी जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवासाठी. मी येतेय तुम्हीही या नक्की भेटू, अशी साद अभिनेत्री तथा सैराट फेम आर्ची हिने जळगावकरांना घातलीय. सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू या महोत्सवाला उपस्थित असणार आहे. आर्ची म्हणाली, नमस्कार… नमस्कार मी रिंकू राजगुरू मी येतेय जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवासाठी ३ मार्च २०२४ रविवारी संध्याकाळी ६ वाजता. पोलीस कवायत मैदान येथे मी येतेय तुम्हीही या.. नक्की भेटू धन्यवाद अशी भावनिक साद तिने घातली.
२८ फेब्रुवारी ते रविवार ३ मार्चपर्यंत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई तसेच जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र तसेच खान्देश संस्कृतीचा सुरेख संगम असलेल्या पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र तसेच खान्देश संस्कृतीचा सुरेख संगम या महोत्सवातून दिसतो आहे. स्थानिक कलावंत तसेच लोक कलावंताना या महोत्सवातून व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या कलागुणांचा एक संधी मिळाली. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा होत आहे.
आज महासंस्कृती मॅरेथॉन व स्केटींग रॅली काढण्यात येईल. सायंकाळी ५.३० वाजता अवधेय एक आदर्श नृत्य नाटिका सादर होईल. सायंकाळी सहा वाजता सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरु ही या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहे. साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा हे नाटकही महोत्सवात रंगत आणणार आहे. रविवारची महोत्सवातील संध्याकाळ चुकवू असे असेच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.