सोमवार ठरला घातवार! वाहनाचा कट लागल्याने, कोसळून तरुण जागीच ठार, पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव :  रुग्णालयात दाखल असलेल्या चुलत भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी येत असताना दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश सपकाळे हा तरुण जागीच ठार झाला तर मुलाचे काका हे जखमी झाले आहे,हा अपघात सोमवारी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ झाला.अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रुग्णालयात दाखल असलेल्या चुलत भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी येत असताना दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश सपकाळे हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे हे जखमी झाले आहे. हा अपघात सोमवार, ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील गाढोदा येथील नवल सपकाळे यांचा मुलगा जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्याला डबा देण्यासाठी नवल सपकाळे व त्यांचा पुतण्या संजोग सपकाळे हे दुचाकीने जळगावला येत होते. खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे येत असताना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला.

त्यामुळे दुचाकीस्वार काका-पुतणे हे रस्त्यावर कोसळले. त्यात संजोग हा मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आला व चिरडला गेला. तर त्याचे काका जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व तरुणाचा मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.