लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू केली. मात्र, काही वर्षांतच ही सेवा बंद केल्याची नामुष्की आता महामंडळावर येत आहे.प्रवासी यापुढे वाय-फाय वापरत नसल्यामुळे वाढत्या तोट्याचा परिणाम असल्याचे सांगून वाय-फाय सेवा देण्याऱ्यांकडून महामंडळाला ही सेवा बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
यामागील कारण काय?
सुरुवातीला या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण नंतर या सेवेची मागणी वाढली आणि अधिकाधिक प्रवासी त्याचा वापर करू लागले. मात्र, अल्पावधीतच या सेवेचा दर्जा घसरला आणि परिणामी ती बसेसमधून बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना सध्या वायफाय सेवा घेता येत नाही.दळणवळणाच्या इतर साधनांसह विमाने आणि रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सुविधा मिळू शकतात.
खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देतात, तर महामंडळाच्या बसमध्ये अशा सुविधांचा अभाव असतो.त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय बसवले होते. मात्र, काही वेळातच ते बंद करण्यात आले आणि आता बसमधून वायफाय बॉक्स गायब झाल्याने महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे.