Nashik News: ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून १० मुस्लिम तरुण ताब्यात; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Nashik News: नाशिक जिल्ह्यातून एक एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत परिसरातील ब्रह्मगिरी पर्वत परिसरातील ही बातमी असून येथून १ ० मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक नागरिकांना त्यांचा हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे. या तरुणांना पोलिसांनी का ताब्यात घेतले जाणून घ्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी परराज्यातील काही मुस्लिम तरुण ब्रह्मगिरी पर्वत परिसरात आले होते. ते आपल्या मोबाईलमध्ये परिसरात चित्रीकरण करत होते. ही बाब स्थानिक रहिवाशांना खटकली. स्थानिकांनी या मुस्लिम तरुणांना याचा जाब विचारला असता त्यांनी असमाधानकारक उत्तर दिली. तरुणाच्या उत्तराने स्थानिकांचे समाधान न होता संशय बळावल्याने त्यांनी लागलीच ही बाब पोलिसांना कळवली.

स्थानिक नागरीकांनी पोलिसांना कळवताच ते पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या १० मुस्लिम युवकांना ताब्यात घेत सर्वांची चौकशी केली. याकरिता त्यांना त्र्यंबकेश्वरच्या पोलीस स्टेशनला नेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे काही कागदपत्रे व मोबाईल आढळून आले. या कागदपत्रांसह त्याच्याकडील मोबाईलची तपासणी करण्यात येत आहे.

या घटनेने त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या तरुणांनी नेमके कोणाचे आणि कसले फोटो काढले, चित्रीकरण कशाचे केले याचा तपास करण्यात येत आहे. या परिसराचे चित्रीकरण करण्यामागे तरुणांचचा उद्देश काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

एकीकडे मुस्लिम तरुणांच्या या कृत्यांने खळबळ उडालेली असतांना या तरुणांनी, आम्ही पर्यटनासाठी याठिकाणी नेहमीच येत असल्याचे सांगितले. या तरुणांनी केलेल्या दाव्याची पोलीस पडताळणी करत आहेत. पोलीस या मुस्लिम तरुणांकडून अधिक माहिती जाणून घेत त्यांची चौकशी करत आहे.