---Advertisement---

16 वर्षीय मुलीवर केला अत्याचार, त्यानंतर वडिलांना व्हिडिओ पाठवला, पोलिसात गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

Crime News:  महाराष्ट्रातील नागपुरात पोलिसांनी एका 20 वर्षीय मुलाला अटक केली आहे. 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर या मुलाने ती व्हिडिओ क्लिप तिच्या वडिलांना पाठवली. प्रज्योत हरिहर बावनडोळे असे आरोपीचे नाव असून तो नागपूरच्या शांतीनगर भागात राहणारा आहे. तो काही महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असे सांगण्यात येत आहे.

आरोपी आणि पीडितेचे नाते संपुष्टात आल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्नाचे आश्वासन देऊन मुलाने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो मुलीच्या वडिलांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आला. हा मुलगा सध्या बी.कॉम.मध्ये शिकत आहे.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी  अत्याचाराच्या  आरोपाखाली अटक केली. त्याच्याविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---