प्रारूप मतदार यादीवर १८ हजार ९४६ हरकती अन् तक्रारी; दोन दिवसात घेणार निर्णय!

---Advertisement---

 

जळगाव : महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ व त्रुटी असल्याने चौदा दिवसापासून मनपा प्रशासनाकडे हरकती व तक्रारींचा पाऊस पडत आहे. अखरेच्या दिवशी महापालिकेडे २६०७ हरकती तर ४०८ तक्रारींचे अर्ज मनपास प्राप्त झाले आहे. त्यामुळे महापालिकेकडे हरकती व तक्रारी असे एकूण १८ हजार ९४६ अर्ज महापालिका प्रशासनाकडे आले आहे. या हरकती व तक्रारींवर निर्णय घेण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून ३६ टक्के हरकती व तक्रारींवर निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तवला आहे.

मतदार याद्यांवर गेल्या १४ दिवसांपासून मतदार व इच्छुक उमेदवारांकडून हरकती व तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. बुधवार (ता.३) रोजी देखील तब्बल ३ हजार १५ हरकती व तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यामुळे आलेल्या सर्व हरकती व अर्जावर आठ दिवसात महापालिकेला नेमणूक केलेल्या २१ पथकांकडून मतदार यादीवरील हरकती व तक्रारींचा निपटारा करावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

आयुक्तांनी घेतली बैठक

हरकती व तक्रारीं अर्जाचे मतदार याद्यांवर प्रमाण अधिक असल्याने बुधवारी सकाळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हरकती व तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत प्रभागानुसार नेमून दिलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणीकरून निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच शुक्रवार पर्यंत संपूर्ण काम संपविण्यासाठी अतिरिक्त वेळ देऊन काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहे.

६५०० हरकती व तक्रार अर्जाचा निपटारा

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे कर्मचारी आलेल्या हरकती व तक्रार अर्जाचा निपटारा करण्याचे काम सुरू केले आहे. बुधवार पर्यंत ६ हजार ५०० अर्जावर निर्णय घेण्यात आला असून हरकती व तक्रार अर्जाचा निपटारा करण्याचे काम ३६ टक्के झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

१० डिसेंबरला मतदान केंद्रावर यादी होणार प्रसिद्ध

मतदार यादीवर आलेल्या हरकती व तक्रारींचा निपटारा करून निर्णय घेऊन १० डिसेंबर रोजी अंतीम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. १५ रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणी यादी प्रसिध्दी केली जाणार असून २२ डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---