मुंबई : जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अध्यक्ष ललित गांधी यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्हा विकास परिषद घेण्यात आली होती.
या बैठकीनंतरही महाराष्ट्र चेंबरने शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. या प्रयत्नांना यश येत जळगाव जिल्ह्यात नवीन एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आयटी उद्योगासाठी २०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या निर्णयाचे महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील यांनी स्वागत केले आहे. जळगाव विकास परिषदेत दिलेले आश्वासन पूर्णत्वास जात असल्याची
प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी चेंबरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य किरण बच्छाव, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, अश्विन परदेशी, तसेच जळगाव एमआयडीसीचे अधिकारी सुनील घाटे पाटील, उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमोद संचेती, रवी फालक, संतोष इंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
Jalgaon News : जळगावात आयटी उद्योगासाठी २०० एकर जागा राखीव ठेवणार; उद्योगमंत्री उदय सामंत
by team
Published On: एप्रिल 6, 2025 3:37 pm

---Advertisement---