---Advertisement---
2000 rs Note Exchange: केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्ये नोटबंदी जाहीर केली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्य़ा होत्या. त्यानंतर २००० हजाराची नोट चलनात आली. त्यानंतर १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा देखील चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या घोषनेनंतर दोन हजाराच्या नोटा बदवून देण्यात आल्या होत्या. नोटबंदीनंतर 3.56 लाख कोटी रुपये किमतीच्या नोटा आरबीआयकडे परत आल्या. तर 6,017 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. एकूणच या नोटबदलीतून 98.31 % नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. उर्वरित नोटा आजही अनेकांच्या घरी आहे. अशात तुमच्याकडे देखील गुलाबी रंगाची २००० हजाराची नोट असेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण, तुमच्याकडे असलेल्या नोटा बदलवून घेण्याची संधी या निमित्ताने चालून आली आहे. चला तर मग या नोटा कशाप्रकारे बदलवून घेता येतील जाणून घेऊया.
नोटबंदीच्या निर्णयानंतर, आरबीआयने 9 ऑक्टोबर 2023 पासून बँकांमध्ये या नोटा बदलण्याची सुविधा बंद केली होती. त्यामुळे अनेकांना या सुविधेचा लाभ घेता आला नव्हता. मात्र, आता नोटा बदलण्याची संधी चालून आली आहे. त्यानुसार आता तुम्ही तुमच्या जवळच्या २००० च्या नोटा बदलवू शकतात. पण त्यासाठी काही नियम आहे. या नियमानुसार, तुम्ही फक्त आरबीआयने जारी केलेल्या १९ कार्यालयांमध्ये या नोटा जमा करू शकता किंवा बदलू शकता.
या ठिकाणी करु शकता नोटा बदली
आरबीआयच्या नियमानुसार, ज्या कार्यलयात २००० हजाराची नोट बदलता येवू शकतो ही कार्यालये नवी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, नागपूर अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, भोपाळ, चंदीगड, गुवाहाटी, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, जम्मू, लखनऊ, पटणा आणि तिरुअनंतपुरम येथे आहेत. आरबीआयने निर्देशित केलेल्या ठिकाणी तुम्ही दोन हजाराच्या नोटा जमा करू शकता किंवा तुमच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून या नोटा कोणत्याही आरबीआय जारी कार्यालयात पाठवू शकता.
अशा करा नोटा बदली
आरबीआयच्या नियमानुसार, आजही तुम्हाला तुमच्य़ा जवळ असलेल्या २००० हजाराच्या नोटा बदलवून हव्या असतील तर तुम्हाला काही नियमांची पुर्तता करावी लागेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफीसला जात एक अर्ज भरावा लागेल. या अर्जामध्ये तुम्हाला तुमचे बँक तपशील, पॅन कार्ड आणि नोटांबद्दल माहिती द्यावी लागेल. यासोबत, ओळखपत्राची प्रत जोडीवी लागेल. ही प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर पोस्ट ऑफीस तुमच्याकडून इन्शुरन्स स्वरुपात काही रक्कम घेईल. त्यानंतर, २००० च्या नोटा एका पाकिटात सीलबंद करुन आरबीआय कार्यालयात पाठविल्या जातील. आरबीआयला नोटा मिळाल्यानंतर, तुमचे पैसे तुम्ही दिलेल्या खात्यात काही दिवसांनी जमा होतील.