---Advertisement---
काकू ही आईच्या जागेवर असते अर्थात आईसमान असते, पण काकूच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे, चक्क काकू आपल्या पुतण्याच्या प्रेमात पडल्याचं समोर आलंय. पुतण्या आणि काकू यांनी आपल्या वयाचे भान न ठेवता सर्व मर्यादा ओलांडल्या आणि या मर्यादा ओलांडताना त्यांनी कुठलाही विचार न करता घरातून निघून गेले. विशेष बाब म्हणजे पुतण्या हा नववीत आहे, अल्पवयीन आहे. गेल्या दहा दिवसांपासून या दोघांचे कुटुंबीय आणि पोलीस काकू आणि पुतण्याचा शोध घेत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या शोध कार्याला यश आलं असून पोलिसांनी काकू आणि पुतण्याला शोधून काढल आहे. ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होते. हे प्राथमिक चौकशीत समोर आले. हे संपूर्ण प्रकरण आहे उत्तर प्रदेश राज्यातल्या गोरखपुर शहरांमधलं.
उत्तर प्रदेशच्या गोरखपुर शहरातल्या पिपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकू आणि पुतण्याच्या या प्रकरणाची तक्रार दाखल झाली होती. गेल्या दहा दिवसांपूर्वी काकू आणि पुतण्या हे घरातून पळून गेले होते. नववीत शिकणारा 15 वर्षांचा पुतण्या त्याच्या आईवडिलांसह 35 वर्षांच्या काकू सोबत राहत होता. काका हा नोकरी निमित्त बाहेरगावी वास्तव्यास होता. दरम्यान काकू आणि पुतण्या मध्ये असे काही प्रेमसंबंध बहरू लागले की ते दिवस दिवसभर एकमेकांशी बोलत असत, दोघांमध्ये काकू आणि पुतण्याचं नातं असल्याने कोणत्याही व्यक्तीला त्यांच्यावर कधीही संशय आला नाही.
मात्र 26 जानेवारीला काकू आणि पुतण्या हे दोघेही जण अचानक घरातून बेपत्ता झाले. त्याच्या कुटुंबीयांनी परिसरात सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुठेही मिळून आले नाही. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी गोरखपूरच्या पोलीस ठाण्यात 10 दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि लवकरात लवकर दोघांनाही शोधून काढण्याची मागणी केली. दरम्यान कुटुंबीयांची तक्रार दाखल होतात पिपिगंज पोलीस हे ॲक्शन मोडवर आले. आणि सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासह कुटुंबीय सुद्धा त्या दोघांचा दिवस रात्र चौफेर शोध घेत होते.
पोलिसांनी कुटुंबीय शोध घेत असताना सोमवारी पोलिसांनी या काकू आणि पुतण्याच्या जोडीला अटक केली. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली आणि चौकशी दरम्यान पुतण्याने सांगितलं. की आम्ही लग्न करण्याच्या तयारीत होतो, आणि त्यांच्या लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडलं दोघांना पीपिगंज पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. आणि सूचना मिळतात नातेवाईकांनाही पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. त्यावेळी नातेवाईकांनी सांगितलं की दोघांवर कायदेशीर कारवाई करू नका, आणि ते त्या दोघांनाही त्यांच्यासोबत घरी घेऊन गेले मात्र पुतण्याने ह्या चौकशीअंती सांगितलं की त्याला “काकू सोबत लग्न करायचं होतं आणि ते दोघेही लग्नाची तयारी करत होते.”









