अन् कंटेनर थेट हॉटेलात घुसले मग घडले असे काही की…

धुळे:  शिरपूर तालुक्यातील पाळासनेर गावाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली,भरधाव कंटेनर थेट हॉटेलात घुसल्याने १२ जणांना चिरडल्याने थरारक घटना समोर आली आहे. या अपघात हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,शिरपूर तालुक्यातील पाळासनेर गावाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता भीषण अपघात घडला हा अपघात कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे आधी दोन वाहनांना उडविले.

त्यानंतर थेट कंटेनर मार्गावर असलेल्य हॉटेलात घुसल्याने येथील १२ जणांन चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली.