भुसावळ : भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त प कारवाई परळी (बीड) येथील ३१ वर्षीय तरुणाला नऊ जिवंत काडतूस ते व गावठी पिस्टलासह अटक केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. प्रकाश आकाश मुंडे (३१, नाथरा, परळी, की, जि. बीड) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. संशयीताविरोधात अनेक व गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयीताला सोमवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिण बाजूकडील मुसाफिर खान्यात असलेल्या लगेज स्कॅनर मशीनवर एमएसएफ कर्मचारी रफिक ईस्माईल शेख व लोहमार्ग कर्मचारी हवालदार सुभाष पाटील कर्तव्यावर असताना रविवारी सायंकाळी ५.४० वाजता संशयीत प्रवासी जात असताना त्यास थांबवनू बॅग तपासणीचा इशारा करण्यात आला व मशीनमध्ये बॅग स्कॅन होताच यंत्रणेला सिग्नल मिळताच संशयीताला ताब्यात घेण्यात आले व पंचांसमक्ष बॅगेची तपासणी केली असता त्यात ३७ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे आढळली.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना व लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. रात्री उशिरा संशयीताविरोधात रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक नरेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले असून पोलिसांकडून याबाबत माहिती काढली जात आहे. काही दिवसांपूर्वीच लगेच स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा आढळला होता व त्यानंतर आता पिस्टल आढळले.