Assembly Election 2024 : मतदान कार्ड हरवलंय ? काळजी करु नका, ‘या’ ओळखपत्राद्वारे करा मतदान

Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सोमवार, सायंकाळी ६  वाजता संपत आहे.  आता, नागरिक  बुधवार, २० रोजी आपला मतदानाचा हक्क बजविणार आहे.  हा  हक्क बजविण्यासाठी आपलं नाव मतदान यादीत असणं आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रांवर मतदान ओळखपत्र दाखवणंही  तेवढंच आवश्यक असणार आहे.

मतदान करताना जर आपल्याकडे निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारे ओळखपत्र नसेल किंवा ते गहाळ झाले असेल, तर अशावेळी काय करावे असाही प्रश्न काही मतदारांना पडतो. याबाबतच निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली.

महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्र नसेल, तर ओळखीचा पुरावा म्हणून 12 पर्यायी कागदपत्रांची यादी जारी केली आहे. यात आधार कार्डापासून अनेक दस्तावेजांचा समावेश आहे.


‘हे’ आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे

1. आधार कार्ड

2. पारपत्र (पासपोर्ट)

3. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

4.मनरेगा रोजगार ओळखपत्र

5. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक

6. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

7. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज

8. पॅनकार्ड

9. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड

10.संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र

11. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

12. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र