जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर चौक मेहरूण येथे २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादा प्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.
आज २१ नोव्हेंबरपासून ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याची सुरुवात माजी महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन करून करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायण हभप पंढरीनाथ महाराज कोर्हाळा बाजार यांच्या मुखातून होणार आहे.
रोज रात्री हरिनाम सहकीर्तन आठ ते दहा या वेळेत होणार असून सांगता समारोप गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.