Assembly Result 2024 : जिल्ह्यात मतमोजणीची तयारी पूर्ण ; कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील  १३९ उमेदवारांचे भवितव्य २० रोजी मतदान यंत्रात बंद झाले आहे. तर मतमोजणी उद्या शनिवार २३ तारखेला होणार आहे. मतमोजणीकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी केंद्रावर जय्यत अशी तयारी सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. तर दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार.

विधानसभा निवडणूक मतमोजणीकरिता कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असणार आहे. याबाबत निवडणूक विभाग जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहिता 163 अन्वये जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. ज्यांना सुरक्षा पासेस देण्यात आलेले आहेत, त्यांनाच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतुकीसह इतर सुरक्षिततेच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलं.

जिल्ह्यातील ११ मतदार संघात सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.  यात मतमोजणीसाठी सर्वाधिक २९  फेऱ्या  ह्या जळगाव ग्रामीण मतदार संघात होणार असून सर्वांत कमी १९ फेऱ्या ह्या जळगाव शहर मतदार संघांत असणार आहेत.

मतमोजणीसाठी मतदार संघ निहाय फेरी पुढील प्रमाणे

चोपडा – २५

रावेर – २४

भुसावळ – २३

अमळनेर – २४

एरंडोल – २२

चाळीसगाव – २५

पाचोरा – २६

जामनेर – २५

मुक्ताईनगर – २३