---Advertisement---

पैशांच्या वादावरून दाम्पत्यावर लोखंडी सुऱ्याने हल्ला, गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : पैशांच्या वादावरून शेतकरी पती-पत्नीला लोखंडी सुऱ्याने वार केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे गावात सोमवारी घडली. मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजना सुरेश कोळी (वय ३८, रा. जुने कोळदे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. १६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील अंगणात वरील कारणावरून संशयित सोनू भिका कोळी, मीराबाई भिका कोळी, नयनाबाई सोनू कोळी (सर्व रा. जुने कोळदे) यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.

तसेच सोनू कोळीने लोखंडी सुऱ्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडाला व फिर्यादीचे पती सुरेश कोळी यांच्या पाठीवर वार करून जखमी केले. या मारहाणीत दाम्पत्य जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---