---Advertisement---
जळगाव : जागतिक स्तरावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनदिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयात शनिवारी (२१ जून) रोजी योग संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉमन योगा प्रोटोकॉल अर्थात योग साधनेचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी आणि योगप्रेमी साधकांकडून करून घेण्यात येईल. प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण मंदिर जळगाव येथील स्वामी नयनप्रकाशजी हे उपस्थित असतील त्याचबरोबर मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य सुषमा कंची, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, प्राचार्य युवा कुमार रेड्डी, श्री शशिकांतजी वडोदकर प्रशासकीय अधिकारी के. सी. ई. सोसायटी तसेच कोषाध्यक्ष श्री. डी. टी. पाटील, लेफ्टनंट आश्विन वैद्य इत्यादी मान्यवर उपस्थित असतील.
योग दिनानिमित्त २३ जून ते ३० जून या कालावधीत महिलांसाठी निःशुल्क योग थेरपी शिबिराचे आयोजन सुद्धा सोहम योग विभागामध्ये संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत त्रिवेणी समूहाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.