---Advertisement---

बापरे ! ‘मनमंदिर’मध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन्…

---Advertisement---

जळगाव : चोपडा-यावल महामार्गालगत असलेल्या ‘मनमंदिर’ परमिट रूम व लॉजिंगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर यावल पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

पोलीस सूत्रानुसार, पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे यांना यावल-चोपडा रस्त्यावर किनगाव शिवारात मनमंदिर बारमध्ये बेकायदेशीर कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी तत्पूर्वी बनावट ग्राहक आणि पंच पाठवून याबाबत खात्री केली. गुरुवारी (१९ जून) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली.

या कारवाईत घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवालदार वासुदेव मराठे, अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी, भारत कोळी, मिनाक्षी तडवी, अल्लाउद्दीन तडवी उपस्थित होते.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८, रा. दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा.खेडी खुर्द, जळगाव), समाधान शालिक तायडे (वय २२, रा.साकळी) या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---