म्हसावद पोलीस चौकी अंतर्गत वाढत्या चोऱ्या रोखा; राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी

---Advertisement---

 

म्हसावद पोलीस चौकी अंतर्गत क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतातील विविध साहित्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पुरता खचला आहे. या वाढत्या चोऱ्यांवर तात्काळ आळा घालावा आणि पोलीस गस्त वाढवावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे जळगाव महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत आणि सतीश चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.


​शेतकरी दुहेरी संकटात!
​पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र राज्यात पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. अशा बिकट परिस्थितीत आता शेतांतून वीज वाहिन्यांचे केबल, पाण्याच्या मोटारी, झटका मशीन, ठिबक सिंचन (ड्रिप), शेतीची अवजारे, बैलजोडी, बकऱ्या, तसेच सागाची व इतर झाडे आणि साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदील झाला असून त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.


​पोलीस गस्त वाढवावी: म्हसावद पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शेती भागात पोलिसांची गस्त तात्काळ वाढवण्यात यावी.
​चोरांवर कडक कारवाई: चोरी करणाऱ्यांचा छडा लावून त्यांना कडक शासन करण्यात यावे.
​चोरीचा माल घेणाऱ्यांवरही कारवाई: केवळ चोरांवरच नव्हे, तर त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
​मुद्देमाल परत मिळावा: शेतकऱ्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल शोधून तो त्यांना लवकरात लवकर परत मिळावा, जेणेकरून त्यांना या संकटातून सावरण्यास मदत होईल.
​या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी याप्रसंगी संग्रामसिंह सूर्यवंशी आणि उपस्थित माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---