---Advertisement---

Ghodegaon News : घराबाहेर खाटांवर झोपले अन् लागला ट्रॅक्टरचा धक्का; जाब विचारणाऱ्याला केली बेदम मारहाण

---Advertisement---

चाळीसगाव : ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने जाब विचारण्यास गेलेल्या एका इसमाला दोन जणांनी लोखंडी राॅडने बेदम मारहाण केली. ही घटना तालुक्यातील घोडेगावात मंगळवारी (१७ जून) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जगन्नाथ मांगू राठोड (५०) कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी (१७ जून ) रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास ते आपल्या घराबाहेर खाटांवर झोपलेले असताना गावातील कुलदीप ओंकार चव्हाण यांच्या ट्रॅक्टरचा धक्का लागला. त्यावर जगन्नाथ राठोड हे बोलायला गेले असता त्याचा राग येवून सुनिल ओंकार चव्हाण व कुलदीप ओंकार चव्हाण रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

कुलदीप ओंकार चव्हाण यांनी हातातील लोखंडी राॅडने जगन्नाथ राठोड यांच्या डोक्यावर वार केली. त्यामुळे जगन्नाथ यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाले. तसेच सुनिल ओंकार चव्हाण यांनी लोखंडी कुर्‍हाडीच्या दांडक्याने पाठीवर वार केले. राठोड यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना औषधोपचाराकामी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर राठोड यांच्या जाबजबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात कुलदीप ओंकार चव्हाण व सुनिल ओंकार चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---