जळगावात शिवसेना शिंदे गटाकडून सहा खासदारांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक; “अपमानाला दुग्धाभिषेकाने उत्तर….!”

---Advertisement---

 

ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. शहरात आयोजित कार्यक्रमात सहा खासदारांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत खासदारांच्या निर्णयाचे स्वागत केले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित खासदारांवर विविध स्तरातून टीका करण्यात येत होती. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान बोलताना शिवसैनिकांनी राज्यभरात ठाकरे गटाकडून या खासदारांवर टीका करण्यात आली, मात्र त्यांनी घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आणि शिवसेनेच्या बळकटीसाठी असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या खासदारांचा अपमान नव्हे तर सन्मान व्हायला हवा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

दुग्धाभिषेकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी खासदारांप्रती आपला विश्वास आणि समर्थन व्यक्त केले. यावेळी ‘खासदारांचा अभिमान आहे’, ‘शिवसेना मजबूत करण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य’ अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमामुळे परिसरात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---