२० रुपयांच्या व्यवहारावरून खापरखेड्यात राडा; दाम्पत्यासह चिमुकल्याला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील खापरखेडा गावात केवळ २० रुपयांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक दाम्पत्य आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून संबंधित दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित कुटुंबातील अल्पवयीन मुलगा घरगुती वस्तू खरेदीसाठी गावातील एका किराणा दुकानात गेला होता. व्यवहारादरम्यान पैशांच्या हिशोबावरून गैरसमज निर्माण झाल्याने वादाची ठिणगी पडली. मुलाने घरी जाऊन प्रकार सांगितल्यानंतर त्याचे आई-वडील दुकानात जाब विचारण्यासाठी गेले.

यावेळी दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. लाकडी काठी तसेच हाताने मारहाण करण्यात आल्याने महिला, तिचे पती आणि मुलगा जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेमागील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---