---Advertisement---

शिंदेंची शिवसेना हीच खरी : ना.गिरीश महाजन

---Advertisement---

जळगाव: उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आज पक्षांसह चिन्ह पण नाही. त्यांच्याकडे काहीच नसून खारी शिवरोना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावा जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यानी माध्यमाशी बोलताना दिली. याप्रसंगी त्यानी उद्धव ठाकरे याच्यावर जोरदार टीकास्त्र सोडेल.

शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षातील काही पदाधिकारी महायुतीच्या सरकार विरोधात घणाघात करून आरोप प्रत्यारोप करीत असतात. यातचत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मंत्र्यांकडून शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना चांगलेच प्रतिउत्तर देण्यात येत आहे. याअनुषंगाने ना. गिरीश महाजन यांनी भुसावळ येथील योग दिनाच्या कार्यक्रमासगी उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. खरी शिवसेना ही शिदेचीच आहे त्याच्याकडे सुप्रीम कोटनि चिन्ह, नाव त्याना देण्याचे मान्य केले आहे. ५५ पैकी ४८ आमदार शिंदे गटाकडे आहे. शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे. शिंदेंच्या बाजूने कोर्टान शिक्का मोर्तब केला आहे आम्ही म्हणतो म्हष्णून नाही पण खरी सेना शिदेचीच असल्याचे त्यानी सांगितले.

पंतप्रधान मोदींमुळे देश प्रगतीपथावर

राज्यासह देशात अनेक भागामध्ये सते, रेल्वे मार्ग, प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ अनेक कामे सुरू असल्याने देशाचे चित्र बदलल चालले आहे. सर्व क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. उद्योग क्षेत्रात आयातदार ऐवजी आपण निर्यातदार झालो आहोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच्या अकरा वर्षा कार्यकाळाचा पूर्वीच्या काळ याचे मूल्यमापन केले तर खूप मोठा बदल देशात झाला असल्याचे ना. महाजन यानी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---