---Advertisement---
महाराष्ट्र राज्यात मान्सून दाखल झाला असल्याची घोषणा झाली असली तरी संपुर्णराज्यात समाधानकारक पावसासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, किमान 15 जूनपर्यंत ,महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पडणारा पाऊस हा मान्सूनचा पाऊस नसून स्थानिक वातावरणामुळे झालेला अवकाळी किंवा वादळी पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे झालेल्या या पावसाच्या आधारे पेरणी करणे धोक्याचे ठरू शकते.
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 9 जूनपर्यंत काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता. मात्र हा पाऊस सर्वत्र पेरणीसाठी उपयुक्त ठरेल, अशी परिस्थिती सध्या नाही.
याशिवाय, 12 जूनपर्यंत महाराष्ट्र राज्यात विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. विदर्भ आणि खानदेशात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे जाण्याची शक्यता असून मराठवाड्यातही तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहू शकते.
राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. सलग आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा करणे अधिक योग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.









