Jalgaon Crime : घरात घुसून दोन मोबाइल चोरले, फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध

Jalgaon Crime : कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर होते. गृहिणीचे डोळे लागताच चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करत दोन मोबाइल चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (१९ जून) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील जुने भगवाननगर परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (२१ जून) गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

सरीता उर्फ किर्ती विष्णु गायकवाड (वय ३८, रा. भगवान नगर) या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी त्यांचे पती तसेच मुलगा हे दोघे कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी मोबाइल चार्जिंगला लावून कामानिमित्त घराबाहेर पडली. गृहिणी घरातच होत्या. त्या वामकुक्षी घेत असल्याचे पाहून चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात एन्ट्री केली.

११ हजाराचा मोबाइल घेत रेड मी तसेच तीन हजार किमतीचा एमआय असे एकूण १४ हजार रुपये किमतीचे दोन चोरटा पसार झाला. काही अवधीत मुलगी घरी आल्यानंतर तिने आईला मोबाइलची विचारणा केली असता घरात चार्जिंग लावलेला व अन्य एक असे दोघे मोबाइल त्यांना दिसले नाहीत.

त्यानंतर घरात शोध घेतला असता मिळुन आले नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलीस नाईक योगेश बारी हे तपास करीत आहेत. तपासाला गती दरम्यान, रामानंदनगर हद्दीतील भगवाननगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन चोरट्याचा शोध घेण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. फिर्यादीच्या घरापासून फुटेज प्राप्त करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे संशयितापर्यंत तपासचक्रे गतीने पोहोचतील, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment