तेजसच्या कुटुंबियांना नरबळीचाच संशय, वाचा काय म्हणालेय ?

जळगाव : एरंडोल रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा मध्यरात्रीच्या सुमारास नरबळी देण्यात आला. त्याआधी परप्रांतीयांनी त्यास झोपडीत बांधून ठेवले असावे, असा कयास तेजसेच काका नीलेश महाजन यांनी व्यक्त केला आहे. आधीच जर परप्रांतीय कामगारांच्या झोपड्यांमध्ये शोध घेतला असता तर तेजस तेथे आढळला असता आणि त्याचा जीव वाचू शकला असता, असेही मत नीलेश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

रिंगणगावात १६ जून रोजी सोमवारचा बाजार होता. यादिवशी तेजसचे वडील गजानन हे जळगाव येथे गेल्याने तेजसने हार्डवेअरचे दुकान सायंकाळी सात वाजेला बंद करून बिर्याणी खायला गेला होता. यावेळी शेतात काम करणारा परप्रांतीयांच्या मागे जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. कदाचित आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा तत्काळ बघितला असता तर नीलेशचा जीव वाचला असता.

तेजस बेपत्ता झाल्यापासून आठ साडेआठ वाजेच्या दरम्यान 7 परप्रांतीय दोन मांत्रिकांनी तेजसच्या घरी येऊन घराची पूजा केली व तेजस हा खेडी कढोली कडे एका केळीच्या बागेत किंवा परिसरात असल्याचे खोटे सांगितले. इकडे घराची पूजा केली व तिकडे त्यांनी त्यानंतर बळी दिल्याचे निलेश साहेबराव महाजन यांच्याकडून सांगण्यात आले.

परप्रांतीयही करत होते शोधण्याचे नाटक

दरम्यान नीलेशला शोधण्यासाठी आमच्या सोबत खेडीकढोली या गावांकडे आमच्या सोबत संबंधित परप्रांतीय फिरत होते. मात्र त्यांनी आम्हाला त्यांच्या झोपडीकडे तेजसला लपवून ठेवले असल्याची तसुभरही ही शंका येऊ दिली नाही. कदाचित आम्ही त्यांच्या झोपड्यांकडे जावुन शोध घेतला असता तर आज तेजस आम्हाला जिवंत सापडला असल्याचे नीलेश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment