---Advertisement---

पाच हजारांची लाच भोवली, मांडकीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : भडगाव तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ (रा. पाचोरा) व रोजगार सेवक जितेंद्र चौधरी (रा. पाचोरा) यांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी व गट नंबर नमुना आठ मिळवून देण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दि. २३ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. सहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीनंतर लाचेची रक्कम पाच हजारांवर आली होती.

त्यानुसार विभागाने सापळा रचला आणि दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, तपास अधिकारी निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---