---Advertisement---
शेंदुर्णी येथील प.पू .डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ.चारूदत्त साने यांचे २१वे पुण्यस्मरण दिन कार्यक्रम सरस्वती प्राथमिक व श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप कडोबा माळी होते.
मान्यवरांच्या हस्ते कै.डॉ. चारूदत्त साने यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे तसेच संचालक कल्याणी ताई कुळकर्णी यांच्या तर्फे रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच कै. सौ. सुरेखा हेमंत आगरकर स्मरणार्थ रोख रकमेची गणित प्रज्ञावंत शिष्यवृती गुणवंतांना देण्यात आली .
ईशा सूर्यवंशी, शौर्यल सोनवणे, श्रुती पांढरे, स्वर्णिम कुलकर्णी, प्रतीक्षा परदेशी, अपूर्वा महानोर, ओम पाटील,सृष्टी पाटील, मानसी शिंदे, वैष्णवी चौधरी, ओम सूर्यवंशी, दामिनी कळवत्रे,श्रुती चौधरी, गायत्री माळी, हर्षल पाटील, रोशन जाधव या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला .
यावेळी राजेंद्र भारुडे, तसेच अरुण सोहनी, सोयगाव यांनी मनोगत व्यक्त केले .ॲड. देवेंद्र पारळकर (पत्रकार) यांनी मनोगतात संस्थेच्या शैक्षणिक व वैद्यकिय उपक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्था अध्यक्षा डॉ. कौमुदी साने यांनी आपल्या मनोगतात डॉ. चारुदत्त साने यांच्या जीवनावरील आठवणींना उजाळा दिला आणि साने परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले .
अध्यक्षिय भाषणात हभप कडोबा माळी यांनी डॉ. चारूदत्त साने यांच्या वैदयकिय ,शैक्षणिक,सामाजिक कार्याची प्रशंसा केली. यावेळी प्रमुख अतिथी भाजपा उपाध्यक्ष गोंविद अग्रवाल, संस्था सचिव कांतीलाल ललवाणी, संचालक डॉ. कल्पक साने, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्या ऋचाताई साने, कडोबा सुर्यवंशी ,डॉ. किरण सुर्यवंशी,श्रीकांत काबरा,प्रविण सुर्यवंशी, पत्रकार अतुल जहागिरदार, सरस्वती शाळा मुख्याध्यापक राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक प्रमोद सरोदे तर सुत्रसंचालन उपशिक्षक किशोर कुळकर्णी यांनी केले .आभार श्रीकृष्ण विद्यालय मुख्याध्यापिका मिरा इंगळे यांनी मानले . यावेळी विद्यार्थी विदयार्थींनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .