---Advertisement---

दरोड्याच्या तयारीत होते दरोडेखोर; तेवढ्यात धडकले पोलीस अन्…, पुढे काय घडलं ?

---Advertisement---

जळगाव : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील सहा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोपडाच्या मामलदे शिवारात बुधवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पथक तयार केले होते. बुधवारी रात्री मामलदे शिवारातील चोपडा-चुंचाळे रोडवर अंधारात निर्जनस्थळी उभी असलेली कार शिताफीने शोधून काढली. या कारमध्ये सहाजण दडून बसले होते. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता लोखंडी टॉमी, मिरचीपूड, दोर असे घरफोडी करण्यासाठी तापरले जाणारे साहित्य मिळून आले. चारचाकी वाहन, मोबाईल असा मिळून एकूण १० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे.

यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले असून तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे (२५, निगडी, पुणे), विनोद राकेश पवार (२५, चिंचवड), सुनील गोरख जाधव (३०, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुण्यात खून, दंगल, दरोडे, खंडणी, असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस पथकात सपोनि एकनाथ भिसे, दीपक विसावे, संतोष पारधी, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर जवागे यांचा सहभाग होता. आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठटी सनातण्यात आली आटे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---