---Advertisement---
जळगाव : राज्यासह जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढीला लागले आहेत.शासनातर्फे ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा वेळोवेळी देण्यात येत असतो. ऑनलाईन फसवणुकीत मोबाईलद्वारे संपर्क साधून फसवणूक करण्यात येते. असाच एक फसवणुकीचा प्रकार चाळीसगाव शहरात घडला आहे.
आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करीत सायबर भामट्याने एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाईन लूट केली आहे. यात त्याने ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---
चाळीसगाव येथील प्रकाश बाबुलाल शिंपी (७३, फुले कॉलनी, चाळीसगाव) हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांना १६ ते २३ जून २०२५ या कालावधीत सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधला. यात त्याने मोबाइलद्वारे व्हॉट्स अॅप व्हिडीओ कॉल आणि चॅटद्वारे संवाद साधला.
या भामट्याने प्रकाश शिंपी यांना सीबीआय आणि दिल्ली पोलिस बोलत असल्याचा देखावा करण्यात आला. या बनावट सीबीआय अधिकाऱ्याने ‘तुमचे बँक खाते मनी लॉड्रिगसाठी वापरले जात आहे.’ अशी माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. या सायबर ठगाने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रकाश शिंपी यांनी या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनच्या तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.