---Advertisement---
तळोदा : शहरातील नागरिकांचा अस्मितेचा विषय असेलेल्या स्मारक चौकाची दुर्दशा झाली आहे. स्मारकाचे सुशिभिकरण करुन त्याचे गत वैभव पुन्हा मिळवून द्यावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.
तळोदा शहरातील नागरिकाचा जिव्हाळ्याचा असलेला स्मारक चौकाची उभारणी करण्यात आली. यात स्मारकाच्या चौथऱ्याच्या सरंक्षणासाठी चारी बाजुंनी लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. दरम्यान, चौकाच्या सुशोभीकरणासाठी मार्बल लावण्यात आले. तसेच चारी बाजूस संरक्षणासाठी पालिकेने सुशोभित स्टील खांब व त्यात स्टिल पाईपच्या डिझाईनच्या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. आज स्मारक चौकात लावलेल्या स्टील पाईपाच्या दक्षिण बाजूंच्या संपूर्ण जाळ्या मोडकळीस आल्यसून तेथे फक्त खांबच उभे आहेत. तर जाळ्या तेथून गायब झाल्या आहेत.
---Advertisement---
आणखी काही ठिकाणांच्या एक दोन ठिकाणी स्टील जाळ्या-चौरसांच्या गायब झाल्या आहेत. जाळ्या नसल्यामुळे ओट्यावर मोकाट कुत्रे, व इतर प्राणी फिरत असतात. त्याठिकाणी या प्राण्यांनी कोणतीही घाण केली तर अनुचित प्रकार घडून वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तात्काळ जाळ्या बसविण्यात याव्यात तसेच चौकात विद्यूत पोलावर कोणी बॅनर लावणार नाही याची काळजी पालिकेने घेणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहेत.
या चौकांत सकाळपासून काही व्यावसायिक आपल्या दुकाने थाटली आहेत. यामुळे स्मारकाच्या जाळ्या गायब झाल्याचे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. नगर पालीकेने याकडे त्वरित लक्ष घालून गायब झालेल्या जाळ्या नवीन परत बसविण्यात यावेत अशी मागणी शहरातून नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्मारक चौकात १५ ऑगस्ट,२६जानेवारी १ मे ह्या दिवशी शहरातील नागरीक ध्वज रोहनाचा कार्यक्रमाला येत असतात येत्या स्वांतत्र दिना पर्यन्त परत स्मारकचौका ला गतवैभव प्राप्त होईल त्या दृष्टी ने पालीके ने उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे