---Advertisement---
धुळे : शहरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात आझाद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गंत खुनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या व जुने धुळे परिसरात गायकवाड चौकांत दहशत माजविणाऱ्या तिघांची पोलिसांनी धिंड काढली. या टोळीमुळे परिसरातील वातावरण भीतीदायक झाले होते. या गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून दोन गटांत मोठा संघर्ष झाल्याने परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.
गायकवाड चौकांत मागील काही महिन्यांपासून दोन गटांत संघर्ष सुरु होता. या संघर्षातून हाणामारीचे प्रकार देखील घडले होते. यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत हातात शस्त्र घेऊन एका घरासमोर दहशत माजवताना काही युवक दिसत होते. या पार्श्वभूमीवर देवरे परिवाराकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले.
---Advertisement---
सिद्धार्थ राजू देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानसागर ऊर्फ नाना विठ्ठल साळवे, विज श्रीराम अहिरे, सुमित तुकाराम शिंदे, अमर धर्मा अहिरे, योगेश सूर्यवंशी आणि भैय्या शेवतकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून भैय्या बाळू उलभगत (शेवतकर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार निलेश देवरे, अंजली निलेश देवरे, नाना धांड्या उर्फ सिद्धार्थ देवरे, बेबीबाई राजू देवरे आणि दिगंबर देवरे यांच्याविरुद्धही गुन्हा आला आहे. या दोन्ही गटांमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर है पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढून इशारा दिला की, कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी व्यवहार खपवून घेतला जाणार नाही.