---Advertisement---

Jalgaon News : नवविवाहिता, दोन विवाहित तरुण; तिघांची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव : शहराजवळील नेहरूनगरसह तालुक्यातील लमांजन व मोहाडी अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका नवविवाहितेचा समावेश असून, अन्य दोन घटनांमध्ये विवाहित तरुणांचा समावेश आहे.

नेहरू नगर परिसरातील रहिवासी नानक कन्हैयालाल सोढाई (३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते रविवारी रात्री झोपले व सोमवारी दुपार झाली तरी त्यांनी खोलीचा दरवाजा न उघडल्याने त्यांच्या भावजयीने दरवाजा वाजविला. तेव्हा घटना समोर आली.

दुसऱ्या घटनेत, मोहाडी येथील मंगल शालिक सपकाळे (३१, रा. उन्मेश पार्क) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी खालच्या मजल्यावर नातेवाइकांशी बोलत असताना वरच्या खोलीमध्ये तरुणाने गळफास घेतला. दोर तुटून तरुण खाली कोसळला व मोठा आवाज आल्याचे शेजारच्याने मंगल सपकाळे यांच्या पत्नीला सांगितले. त्यावेळी त्यांनी वरील खोलीमध्ये जाऊन पाहिले असता ही घटना समोर आली.

लग्न होऊन सहा महिने झाले अन् संपविले जीवन

सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या अश्विनी गणेश पाटील (१९, रा. लमांजन, ता. जळगाव) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (१४ जुलै) दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अश्विनीचे पती गणेश पाटील हे एमआयडीसी परिसरातील कंपनीत कामाला गेले होते तर सासू-सासरेही बाहेर गेलेले होते. विवाहितेचे माहेर गावातीलच आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---