---Advertisement---

आसाममध्ये सापडला कच्च्या तेलाचा खजिना, थेट तेल उत्पादन करून होणार मालामाल

---Advertisement---

आसाम सरकार लवकरच तेल उत्पादनात थेट सहभाग घेणार आहे. दिब्रुगड जिल्ह्यातील नामरूप बोरहाट विहिरीत हायड्रोकार्बनचा मोठा साठा सापडत्याने हे शक्य होणार आहे. आसाम सरकार ऑईल इंडिया लिमिटेडसोबत भागीदारी करून तेल उत्पादनात उतरणार आहे. यामुळे आसाम थेट तेल उत्पादन करून त्यातून नफा कमावणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामचे हे ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक लवचिकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ऑईल इंडिया लिमिटेडने बोरहाट विहिरीत हायड्रोकार्बन शोधला आहे. या विहिरीत आसाम सरकारची महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.

या शोधामुळे तेल उत्खननात यशस्वी गुंतवणूक होईल आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेत योगदान मिळेल. या शोधामुळे आसाम हे थेट तेल उत्पादक राज्य बनले आहे. यामुळे तेल शोध मोहीम यशस्वी झाली आहे. आसामला यातून महसूल मिळेल. हा आमच्यासाठी गौरवपूर्ण क्षण असल्याचे ते म्हणाले.

आसाम आता सहउत्पादक राज्य

आसाम आतापर्यंत केवळ नैसर्गिक संसाधन पुरवणारे राज्य होते आणि रॉपल्टीच्या माध्यमातून कमाई करत होते. या राज्याने तेल आणि वायू क्षेत्रात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिगबोई येथे देशातील पहिली तेल विहीर आसाममध्येच आहे. आसाम केवळ पुरवठादार न राहता तेल उत्पादन कंपन्यांसोबत सह-उत्पादक बनले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---