---Advertisement---

खामगाव शहरात मानवतेला काळीमा : दलित तरुणाला विवस्त्र करून मैदानात मारहाण; दोन आरोपी अटकेत, एक फरार

---Advertisement---

---Advertisement---

बुलढाणा : जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. खामगाव येथे दलित तरुणाने गाय चोरल्याचा संशय घेत त्याला विवस्त्र करीत बेदम मारहाण करण्यात आली. दलित तरुणाला मारहाणीची घटना समोर आल्यानतंर ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या कार्यकर्त्यांनी यावेळी इशारा देत आरोपींवर मकोका लावा, कठोर कार्यवाही करावी. त्यांचे घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी केली. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यात वाईट परिणाम होतील, असा इशारा दिला. दरम्यान, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

खामगाव शहरात बसस्थानक परिसरात रात्री एका २४ वर्षीय दलित तरुणाचं अपहरण करण्यात आले. त्याला जवळच असलेल्या मैदानात नेण्यात आले आणि जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या तरुणाच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यात आले. यानंतर त्याचे गायींसोबत व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले.

---Advertisement---

त्यानंतर पुन्हा त्या तरुणाला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले, तेथे देखील त्यास विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. ही मारहाण चालू असतांना पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना तीन पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात घडली आहे. या मारहाणीत या दलीत तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचं हाड मोडलं आहे. सध्या या तरूणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ दोघा तरुणांना अटक केली आहे. मात्र तिसरा तरुण अद्यापही फरार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment